Shetkari Karjmafi: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. राज्यामध्ये महायुती सरकारला भरगोस यश मिळाले आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले देवेंद्र फडणीस यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर होईल अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून व्यक्त केली जात आहे. Shetkari Karjmafi