महिलांना या तारखेपासून मिळणार ₹2100 रुपये, नवीन तारीख आली समोर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Letest News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सव्वा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांना आर्थिक बळ मिळावे आणि त्यांना पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून व्यवसाय करण्यात थोडी का होईना मदत व्हावी या उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

राज्यातील महिलांसाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेने महायुती सरकारला मोठे बळ दिलेले आहे. या योजनेमुळे युतीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे या विजया मागे फक्त लाडकी बहीण योजना आहे असं सांगण्यात येत आहे.

सव्वा हप्ता कधी मिळणार ?

पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची रक्कम दीड हजार रुपये वरून ₹2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती.

आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेच राज्यांमध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता ची रक्कम दीड हजार रुपये वाढवून ती ₹2100 करण्यात येणार आहे. त्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

तसेच पुढचा हप्ता ही यावेळेस महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ शकतो. अद्याप सरकार अंतर्गत कोणती तारीख समोर आलेली नाही. 5 डिसेंबर रोजी राज्यात मुख्यमंत्री पदाची शपथ होणार आहे. शपथ झाल्यानंतर देखील महिलांच्या खात्यावरती ₹2100 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

error: Content is protected !!