मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू! या कागदपत्रांची गरज भासणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Letest News: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण येण्यासाठी अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केलेला नाही, त्या महिलांना अर्ज करण्यासाठी आता एक संधी मिळणार आहे. त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासणार आपण जाणून घेणार आहोत. Majhi Ladki Bahin Yojana Letest News

सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आता ही मदत वाढून 2100 रुपयांची मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. म्हणजे या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत.

नवीन अर्ज प्रक्रिया

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत या योजनेमध्ये अर्ज करू शकले नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही महिला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राच्या कमतरतेमुळे तसेच वेळेच्या अभावी आणि अन्य काही समस्यामुळे या योजनेत अर्ज करू शकल्या नाहीत. त्यांनाही या योजनेचा अर्ज मिळू शकतो.

त्यासाठी महिलांना पुन्हा एकदा एक संधी मिळणार आहे. या टप्प्या सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल व त्यांचे अर्ज मंजूर होतील व त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तर तुम्हीही या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल व तुम्ही अर्ज करू शकला नसाल तर या मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांची गरज भासणार आहेत त्यामुळे कागदपत्रे तयार ठेवा.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता निकष

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
  • सर्व विवाहित अविवाहित घटस्फोटीत निराधार या महिलांना या योजनेत अर्ज करता येणार आहे.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण येण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड
  • निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

माझी लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील महिलांना सव्वा हप्ता वितरित करण्यात येणार आहेत. त्यांचा खात्यावर 2100 रुपये जमा होतील. त्याचबरोबर नवीन अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!