Pm Kisan : पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा वाचा सविस्तर

LaBharati list : शेतकऱ्यांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान(Pm Kisan Samman Nidhi) निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या मदतीची 19वा हफ्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात आला. त्यानंतर आता अनेक शेतकरी आपल्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेतून दरवर्षी 6000 रुपये तीन टप्प्यांत म्हणजे 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांद्वारे दिले जातात. त्यामुळे जून 2025 मध्ये 20वा हफ्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अजूनही यावर केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे बरेच शेतकरी संभ्रमात आहेत की हफ्ता कधी येणार आणि यावेळी त्यांचं नाव यादीत आहे की वगळलं गेलं आहे.LaBharati list

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांनो, या योजनेत आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले आहेत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी आलेल्या शेवटच्या हप्त्यात सुमारे 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 22,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. आता जून महिना जवळ येत चालला असतानाच सर्वांचे लक्ष 20व्या हप्त्याकडे लागले आहे. अनेकजण दररोज आपला खाताचेक करतात की पैसे आलेत का ते पाहण्यासाठी. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्या नावाची यादीत नोंद आहे की नाही, हे आधी तपासणं गरजेचं आहे.

तुमचं नाव यादीत आहे की नाही? असं करा तपासणी

1. सर्वप्रथम PM किसान योजना अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जा.

2. तिथे “Farmers Corner” या विभागात “Beneficiary List” वर क्लिक करा.

3. आता तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव याबाबतची माहिती भरा.

4. मग “Get Report” वर क्लिक करताच तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यात तुमचं नाव शोधा.

हफ्ता जमा झाला की नाही? पेमेंट स्टेटस असं तपासा

1. पुन्हा एकदा www.pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.

2. “Farmers Corner” मध्ये “Know Your Status” वर क्लिक करा.

3. तुमचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

4. कॅप्चा कोड भरून “Get OTP” वर क्लिक करा.

5. मोबाईलवर आलेला OTP भरल्यावर “View Status” वर क्लिक करा.

6. तुमचं पेमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल, त्यात पैसे जमा झाले की नाही ते स्पष्टपणे पाहता येईल.

काही कारणांमुळे तुमचा हफ्ता थांबू शकतो – हे लक्षात ठेवा

जर तुम्ही अजूनही e-KYC पूर्ण केलेलं नसेल, तर हफ्ता अडकण्याची शक्यता आहे.

तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल, किंवा खाते बंद असेल, किंवा माहिती चुकीची दिली असेल तरही पैसे येणार नाहीत.

अर्ज करताना जर कागदपत्रं योग्यरीत्या अपडेट केली नसतील, जुनी माहिती असेल, तरही तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं.

अर्जात डुप्लिकेट नाव, चुकीचा पत्ता किंवा चुकीचा आधार क्रमांक दिल्यास सुद्धा तुमचा हफ्ता थांबतो.

शेतकऱ्यांनो, ही योजना तुमच्यासाठी सरकारनं दिलेली मोठी मदत आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमचं नाव यादीत आहे का, अर्जातील माहिती योग्य आहे का, हे स्वतः पाहणं गरजेचं आहे. वेळेत e-KYC करा, आधार आणि बँक खाते लिंक करून ठेवा आणि काही शंका असल्यास जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. सरकारने योजना चालू ठेवली आहे, त्यामुळे थोडी प्रतीक्षा केल्यानंतर जून महिन्यात 20वी हफ्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. काळजी नको, फक्त सतत अपडेट राहा!

(Disclaimer : वर दिलेली माहिती सरकारी वेबसाईटच्या आधारे आणि प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे आहे. याबाबत आमची टीम कुठलाही दवा करत नाही)

1 thought on “Pm Kisan : पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा वाचा सविस्तर”

Leave a Comment