IND vs ENG Test 2025 : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर; तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता, टीम इंडियाची चिंता वाढली

IND vs ENG Test 2025 : भारतीय क्रिकेटप्रेमींना सध्या सगळ्यात जास्त उत्सुकता असेल, तर ती आहे इंग्लंड दौऱ्याच्या कसोटी मालिकेची. आणि आता काही तासांवर येऊन ठेपलेल्या या मालिकेच्या सलामी सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीसाठी त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर करत जोरदार दबाव तयार केला आहे. २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे, आणि त्यापूर्वी इंग्लंडने थेट तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. IND vs ENG Test 2025

भारताकडून गिलकडे नेतृत्व, पण इंग्लंड आक्रमक

भारतीय संघाचं नेतृत्व यंदा शुबमन गिलकडे देण्यात आलं असून, तर इंग्लंडकडून कर्णधारपदी पुन्हा एकदा बेन स्टोक्स मैदानात उतरणार आहे. सध्या दोन्ही संघ सराव सत्रात व्यस्त असतानाच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १८ जून रोजी त्यांची अंतिम ११ जणांची यादी जाहीर करत पहिला झटका दिला. विशेष म्हणजे, या संघात काही नवखे खेळाडू असून, अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही इंग्लंडने आक्रमक रचना ठेवली आहे.

जेकब बेथल, सॅम कूक आणि जेमी ओव्हरटनचा पत्ता कट

पूर्वी जाहीर केलेल्या १४ जणांच्या यादीतून जेकब बेथल, सॅम कूक आणि जेमी ओव्हरटन यांना बाहेर ठेवलं गेलं आहे. याचा अर्थ इंग्लंड संघ पूर्ण तयारीत असून त्यांनी वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या आक्रमणावर भर दिला आहे. चार विशेष गोलंदाज, त्यात बेन स्टोक्सचा अतिरिक्त मध्यमगती पर्याय इंग्लंडला मजबूत करतो. IND vs ENG Test 2025

पिचचा अंदाज आणि रणनीतीचा खेळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडकडून फलंदाजीस पोषक खेळपट्टीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडलेली प्लेइंग इलेव्हन पाहता, पिचवर वेगवान गोलंदाजांचा प्रभाव अधिक राहील, असाच अंदाज आहे. जो रूट, ऑली पोपसारख्या तगड्या फलंदाजांसोबत ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर हे तीन नवखे गोलंदाज टीम इंडियाला आव्हान देतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

टीम इंडियाची वाट सोपी की कठीण?

इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडसारखे अनुभवसंपन्न गोलंदाज निवृत्तीनंतर दिसत नसले तरी क्रिस वोक्स हा एकमेव अनुभवी चेहरा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पण त्याचबरोबर इंग्लंडच्या नवख्या आक्रमणाचा फायदा भारतीय फलंदाज घेतात का हेही पाहणं रंजक ठरेल.

इंग्लंडची अंतिम प्लेइंग इलेव्हन (1st Test, Headingley) झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग, शोएब बशीर

खेळपट्टीचं वळण आणि टीम इंडियाची रणनीती ठरवणार निकाल हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर नेहमीच काही ना काही गोंधळ होत असतो. सध्याच्या परिस्थितीत पिचच्या गवतावरून आणि हवामानावरून बरेच अंदाज बांधले जात आहेत. पण अखेर क्रिकेटच्या या कसोटी लढतीत, जो मैदानावर तग धरून खेळेल, तोच जिंकणार.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात कोण उतरते? बुमराह, सिराज, जडेजा की नवा काही प्लॅन? याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.

Leave a Comment