IND vs ENG : करुण नायरचं कमबॅक, साई सुदर्शनचं पदार्पण; शुबमन गिल म्हणाला “फटकेबाजीपेक्षा संयम महत्त्वाचा”

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला अखेर सुरुवात झाली आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पहिल्या सामन्यासाठी नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने लागली आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर पहिल्या डावात मोठा स्कोअर उभारण्याचं मोठं आव्हान उभं आहे. IND vs ENG

करुण नायरची पुनरागमनात एन्ट्री

करुण नायरने 2017 नंतर प्रथमच कसोटी संघात कमबॅक केलं आहे. 6 कसोटीत 374 धावा करणाऱ्या करुण नायरच्या खात्यात एक त्रिशतक देखील आहे. त्याच्या नावावर 303 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. यावेळी त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचं कमबॅक भारतीय फलंदाजी लाईनअपला अनुभवाचा आधार देणारं ठरू शकतं.

साई सुदर्शनचं कसोटी पदार्पण

गुजरात टायटन्समध्ये शुबमन गिलचा जोडीदार असलेला आणि IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा साई सुदर्शन आज कसोटीत पदार्पण करत आहे. कसोटी इतिहासात भारताकडून खेळणारा तो 317 वा खेळाडू ठरला आहे. साई तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असून त्याचा फॉर्म पाहता त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

काय म्हणाला शुबमन गिल?

नाणेफेकीनंतर शुबमन गिलने स्पष्ट केलं “माझ्याकडूनही टॉस जिंकलो असतो तर प्रथम गोलंदाजी घेतली असती. सुरुवातीचा सत्र थोडा कठीण असेल, पण नंतर फलंदाजीसाठी चांगली संधी मिळेल. साई सुदर्शन पदार्पण करत आहे आणि करुण नायरने दमदार कमबॅक केलं आहे. फलंदाजांनी संयम ठेवून खेळायला हवं, कारण लढाई फटकेबाजीतून नाही तर चिकाटीने जिंकता येईल.”

भारताची प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारताच्या फलंदाजांपुढं आज खडतर आव्हान असलं तरी करुण-सुदर्शन जोडी एक नवी आशा ठरू शकते!

Leave a Comment